गणेशोत्सव सणानिमित्त पाच दिवस आधीच पगार मिळणार , सरकारी नोकरदारांना खुशखबर

By Raigad Times    22-Aug-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
 
गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचार्‍यांनात्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन २६ ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, सरकारी नोकरदारांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून १ सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन २६ ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
 
जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन, कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल ५ दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळाती खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे.