धेरंड-शहापूर औद्योगिक क्षेत्र पोहोच रस्त्यासाठी संमती करार करण्यासाठी अंतिम मुदत

By Raigad Times    22-Aug-2025
Total Views |
 
alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्र व धेरंड शहापूर औद्योगिक क्षेत्राकरिता पोहच रस्त्याकरिता शहाबाज येथील एकूण ८.५५.८० हे.आर. क्षेत्र संपादीत होत आहे. यामुळे बाधित शेतकर्‍यांना संपादन होणार्‍या क्षेत्राचा मोबदला वाटपास सुरुवात झाली आहे.
 
अदयाप ज्या शेतकर्‍यांनी करारपत्र सादर केलेले नाही त्यांना समक्ष उपस्थित राहून सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट ही अंतिम मुदत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी दिली आहे. संपादित झालेल्या क्षेत्रासाठी उच्चाधिकार समितीने ७ जुलै २०२५ रोजी प्रति एकरी रूपये ९६ लाख ६९ हजार ५५४ म्हणजेच २ कोटी ४१ लाख ७३ हजारी ८८६ प्रती हेक्टर एवढ्या दरास संमती दिलेली आहे.
 
त्यामुळे प्रकल्पामध्ये संपादन होणार्‍या जमिनीतील बाधीत खातेदार यांना करारपत्राद्वारे रक्कम स्वीकारण्यासाठी नोटीसा बजाविण्यात आल्या असून ३१ जुलैपर्यंत उपविभागीय कार्यालयाकडे करारपत्र सादर करण्या बाबत कळविले होते. त्यानुसार काही खातेदारांनी संमती करारपत्र सादर केले आहेत. या खातेदारांची संपादीत होणा-या क्षेत्राची मोबदला रक्कम खातेदारांच्या बँक खाती जमा करण्यात आली आहे.
 
करारपत्र सादर करण्याची मुदत संपुष्टात आली असली तरी ज्या खातेदारांना उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेला दर मान्य असेल त्यांनी आपले संमती करारपत्र उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया वगळून) २९ ऑगस्टपर्यंत सादर करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केले आहे.