विजेच्या धक्क्याने दिर-भावजयचा मृत्य , कर्जत येथील धक्कादायक घटना
By Raigad Times 21-Aug-2025
Total Views |
कर्जत | कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीतील साळोख आदिवासी वाडीतील दिर आणि भावजय शेवग्याचा पाला काढण्यासाठी गेले असता शेवग्याच्या फांदीवर उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर ते चिकटले. विजेच्या धक्क्याने या दिर भावजयचा मृत्यू झाला.
शेवग्याच्या झाडाच्या फांद्या काढत असताना उच्च दाबाच्या विजेच्या तारा ओल्या झाडावर चिटकलेल्या असल्यामुळे रामचंद्र वाघमारे आणि त्यांची भावजय सुनीता वाघमारे यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. या धक्क्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. रामचंद्र वाघमारे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे मजूर होते. या घटनेने साळोख आदिवासी वाडीवर दुःखाचे सावट पसरले आहे.