पनवेल | शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेमधून कोकण प्रदेश सचिव रुपेश पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पनवेल, उरणची कार्यकारिणीही पक्षातून पूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. नुकतीच ठाणे येथे युवा सेनेची बैठक संपन्न झाली.
यावेळी रुपेश पाटील यांच्यासह पनवेल, उरणमधील पदाधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला. केवळ त्यांना पदावरुन हटविण्यात आले नाही तर युवा सेनेमधूनच बरखास्त करण्यात आले आहे. युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.