अलिबाग | माजी मुख्याध्यापक, आवास गावातील कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत यांची रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रमोद मनोहर भगत हे अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सचिव व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच त्यांना कुस्ती खेळाची आवड होती. प्रमोद मनोहर भगत यांच्या निवडीबद्दल आवास व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच रायगड जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.