साई सहारा येथे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे लोकार्पण

By Raigad Times    18-Aug-2025
Total Views |
 pen
 
पेण | मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंटसमोर एनपीआर सीसीटिव्ही कॅमेरांचे लोकार्पण आज, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
 
यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी संस्थाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. देवदूत कल्पेश ठाकूर हे नेहमीच अपघातग्रस्तांना मदत करत असतात तसेच आपत्कालीन परिस्थितीसुद्धा लोकसेवा करत असतात. त्यांच्याच माध्यमातुन हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा येणार आहेत.