उरण | उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गोविंदा रे गोपाळा - - -तुझ्या घरात नाही पाणी रे घागर उताणी रे गोपाळा अशा जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाल गोपाळ न्हाऊन निघाले होते.
या उत्सवाचे औचित्य साधून नवीमुंबई पोलीसांच्या माध्यमातून उरण, न्हावा शेवा,मोरा सागरी पोलीसांनी अबालवृद्धांना नशा मुक्त अभियानातून जनजागृतीचा संदेश दिला होता.ठिक ठिकाणचे गोविंदा पथक दहीहंडी फोडताना दिसत होते.त्यातील चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष गर्दी केली होती. यंदा दहीहंडी उत्सव शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे.
दहीहंडीची परंपरा द्वापर काळापासून चालत आली आहे. दहीहंडीमध्ये श्रीकृष्णाची वेशभूषा करून भगवान श्रीकृष्णाचे भक्त दही आणि लोणीने भरलेले मडके उंचावर टांगतात आणि मग एक व्यक्ती दुसऱ्यावर चढून थर तयार करतात आणि मडके फोडतात. भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या मनोरंजनाची आठवण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.उरण तालुक्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अमूत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राम श्री दहीहंडीचे आयोजन केले होते.
तसेच महेश बालदी मित्र मंडळ सह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी ठिक ठिकाणी उंच उंच दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक थरावर थर लावून दहीहंडी फोडताना दिसत होते. आयोजकांकडून गोविंद पथकाना सन्मानित करण्यात येत होते.
या उत्सवाचे औचित्य साधून नवीमुंबई पोलीसांच्या माध्यमातून उरण, न्हावा शेवा,मोरा सागरी पोलीसांनी अबालवृद्धांना नशा मुक्त अभियानातून जनजागृतीचा संदेश दिला होता.ठिक ठिकाणचे गोविंदा पथक दहीहंडी फोडताना दिसत होते.त्यातील चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष गर्दी केली होती.