लोणेरे | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले लोणेरे येथील उड्डाणपुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात असून, गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
माणगाव आणि महाडदरम्यान असलेल्या या पुलाचे काम रखडल्यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सवात ही कोंडी अधिक गंभीर स्वरूप धारण करत असे. कोकणात गणपती सण साजरा करण्यासाठी जाणार्या भाविकांसाठी हा मोठा आडथळा ठरतो. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या प्राथमिक टप्प्यात पुलाची एक लेन उघडण्यात येणार असून, उर्वरित काम सणानंतर पूर्ण केले जाईल, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. "हा पूल उघडल्यामुळे गणेशोत्सवाच्या गर्दीत कोकणात प्रवास करणे अधिक सुलभ होईल,” असे त्यांचे म्हणणे आहे. वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"लोणेरे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशोत्सवात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, एक लेन तात्पुरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे." - संतोष शेलार, वरिष्ठ अधिकारी,