अलिबाग | अलिबाग तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथील ४ वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ ते १२ ऑगस्टदरम्यान ही घटना घडली. अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथे राहणारा ४ वर्षांचा मुलगा गावात खेळत होता. यावेळी शेजारी राहणार्या १५ वर्षांच्या मुलाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने केली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ करीत आहेत.