पेण | पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज-३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील आमच्या काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
शिर्की भागातील खारेपाट भागात आजपर्यंत जेएसडब्लू कंपनीने अनेक विकासात्मक कामे केलीआहेत. येथे पाण्याची पाईपलाईन आणली, तलावातील गाळ काढल्याने अधिकचा पाणी वापरायला मिळाला, यासह येथे स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर होता तो सोडवून नव्याने आंबेवाडी, सागरवाडी, शिर्की चाळ १ या तीन ठिकाणी स्मशानभूमी बांधल्या, दीड लाख लिटर पाण्याची टाकी बांधून दिली, शाळेसाठी शौचालय बांधले त्यामुळे सदर कंपनीचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे शेखर पाटील यांनी म्हटले आहे.