भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री बनवण्यासाठी रक्ताने पत्र

By Raigad Times    12-Aug-2025
Total Views |
 SOLAPUR
 
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्‍याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
 
अशातच सोलापूर शहर सचिव तथा भरत गोगावले युवा प्रतिष्ठानचे समर्थ बिराजदार यांनी हे पत्र लिहितानाच या पत्राचा विचार न झाल्यास राज्यातून हजारो कार्यकर्ते त्यांच्या रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवतील, असा इशारा समर्थ बिराजदार यांनी दिला आहे.