कोलाड | पुगाव आदिवासी वाडी येथून राहत्या घरातून २ अल्पवयीन मुलांसह महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. संदीप वाघमारे यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे.
अनिता संदीप वाघमारे ही महिला क्षुतिका संदीप वाघमारे (वय ८), सूरज संदीप वाघमारे (राहणार पुगाव आदिवासी वाडी) या दोन मुलांसह ८ जून रोजी घरातून निघून गेली आहे. ती कोणाला आढळल्यास कोलाड पोलिसांना कळवण्यात यावे, असे आवाहन कोलाड पोलिसांनी केले आहे.