कर्जत येथे रेल्वेमध्ये चढताना महिला प्रवाशाचा अपघाती मृत्यू

By Raigad Times    08-Jul-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी कोयना एक्सप्रेसमध्ये चढताना एक महिला पाय घसरल्याने फलाट व गाडी यामधील पोकळीमध्ये पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. रविवारी (६ जुलै) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास रफत जहान शेख ही महिला मुंबईहून कोल्हापूरला जाणार्‍या कोयना एक्सप्रेसमध्ये चढत असताना पाय घसरुन, फलाट आणि गाडी यामधील पोकळीमध्ये पडली.
 
त्यामुळे त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. जखमेमुळे खूप रक्तस्राव झाला. घटनास्थळी असलेल्या कर्मचार्‍यांनी जखमी झालेल्या महिलेला तात्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया करून त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.