नवीन पनवेल | वास्तव्याच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले आणि त्या पत्त्यावर राहत असल्याचे भासवून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २४ जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
२०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया पनवेल तालुक्यात राबविण्यात आली. यावेळी २४ पालकांनी शाळेच्या एक किलोमीटर अंतरामध्ये पत्त्यावर राहत नसताना त्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचे खोटे वास्तव्याचे पुरावे सादर केले. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी पनवेल यांनी शहर पोलीस ठाण्यात २४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
अली हुसेन रहमतुल्ला खान, मोहम्मद फारुख, जाधव विनोद विठ्ठल, गणेश सुभाष कांबळे, राकेश कश्यप, दत्तात्रय भानुदासराव टाले, विश्वास देवकांता रवींद्रल, किरण तानाजी पाटील, इमरान अजिज पटेल, मोहम्मद सलमान फैयाज खान, नवनाथ पाटील, योगेश सर्जे राव चिकणे, सोफी असिफ चांद साहब, लीलाराम उकर्मा चौधरी, विठ्ठल गोविंदराव पालेवाड, सागर जानकीराम सुतार, श्रीकांत सुरेश बागडे, देव अनुज अमरीश, अहमद अली इनामदार, फिरोज अन्सार शेख, पेंगरी अशांना प्रशांत, नदीम अजमखान, समाधान बाळू राजपूत, अब्दुल्ला रईस मिया शेख अशी या २४ पालकांची नावे आहेत.