सर्व्हेक्षण समितीची कर्जत एसटी आगाराला भेट

By Raigad Times    31-Jul-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सर्व्हेक्षण समितीने २७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक कर्जत एस.टी. आगाराला भेट दिली व सर्व परिसराची पाहणी केली तसेच कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली.
 
समितीने कर्जत आगाराच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखालील सर्व्हेक्षण समिती कर्जत एस.टी. आगारामध्ये आली.
 
विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेेशर जाधव, पत्रकार विजय मांडे, प्रवासी प्रतिनिधी विनोद चौधरी यांचा समितीमध्ये समावेश होता. आगार व्यवस्थापक देवानंद मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वाहतूक नियंत्रक दीपक देशमुख, विलास बागुल यांच्या समवेत संपूर्ण आगार परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबाबत चांगला अभिप्राय दिला.