आज, उद्या कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

By Raigad Times    23-Jul-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.६ ते ४.३ मीटर तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून देण्यात आला आहे.
 
त्यामुळे लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.