स्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी; महापालिकेची उत्कृष्ट कामगिरी

By Raigad Times    22-Jul-2025
Total Views |
 delhi
 
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्‍या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्‍या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
 
राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला १० पुरस्कार मिळाले. दिल्लीत नुकताच झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७८ महापालिका, नगरपालिकांना स्वच्छतेसाठीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव (नगरविकास) डॉ. के. एच. गोविंदराज, स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे संचालक नवनाथ वाठ यांच्यासह आयुक्तांनी पुरस्कार स्वीकारले.
पनवेल देशात सहावे
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महापालिकेने देशात सहावा क्रमांक पटकाविला आहे. तर कचरामुक्त शहर मानांकनात तीन स्टार आणि ओडीएफमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस ही सर्वोच्च श्रेणीदेखील कायम राखली आहे. या यशाबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कौतुक केले जात आहे.