श्रीवर्धन येथे गोखले कॉलेजच्या आवारात कचर्‍याचे साम्राज्य , दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोयात

By Raigad Times    22-Jul-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली पहायला मिळते. गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
या शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेदेखील आरोग्य धोयात येण्याची शयता आहे. श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालय हे आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते. आराठी ग्रामपंचायतची नियमित घंटागाडी नसल्यामुळे नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकत असतात. आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा सद्यस्थितीमध्ये गोखले महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील भागात टाकण्यात येतो.
 
कचर्‍याबरोबरच या ठिकाणी मेलेले कुत्रे, मांजर यांना देखील टाकण्यात येते. सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबवण्यात येते. परंतु आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नागरी वस्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून त्या ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे श्रीवर्धन दिघी मार्गावरून जाणार्‍या प्रवाशांना ही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आराठी परिसरातच पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका इमारतीचे सांडपाणी व संडासच्या टायांमधील पाणी मुख्य मार्गावर वाहत असल्याने त्या ठिकाणी देखील दुर्गंधी पसरलेली पहायला मिळते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सदरचा कचरा वाहून गोखले महाविद्यालयाच्या आवारात गेला आहे.
 
त्यामुळे गोखले महाविद्यालयात व विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तरी गोखले महाविद्यालयाच्या प्रशासनाने आराठी ग्रामपंचायत जवळ संपर्क साधून सदर कचरा उचलण्यासाठी त्यांना कळवावे, अशी मागणी पालकवर्गामधून केली जात आहे. तसेच आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचर्‍याचा प्रश्न गंभीर असून त्या ठिकाणी सांडपाण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.