महाड | किल्ले रायगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची खाजगी बस उलटल्याची घटना रविवारी (२० जुलै) घडली आहे. यामध्ये दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी, २० जुलै रोजी पुणे येथील एका खाजगी कंपनीची टूर किल्ले रायगड पाहण्यासाठी आली होती.
किल्ला पाहून पुण्याकडे परतत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची बस माणगावजवळ निजामपूर-पाचाड रोडवर आली असता पलटी झाली. या अपघातात दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रवाशांना मदत केली आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
जखमींना उपचारासाठी पाचाड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली.