रेवदंडा गोळा स्टॉप येथे एसटीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्य

By Raigad Times    19-Jul-2025
Total Views |
 alibag
 
रेवदंडा | एस.टी. बसची धडक बसल्याने रेवदंडा गोळा स्टॉप येथे ७० वर्षीय वृध्देचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बोर्ली गावातील मधला पाडा येथील ७० वर्षीय वृध्द महिला नम्रता वरसोलकर या शुक्रवारी (१८ जुलै) रेवदंडा येथील रेळे यांच्या डोळे तपासणी व मोफत ऑपरेशन शिबिरासाठी आली होती.
 
डोळे तपासणीनंतर ती घरी परतण्यासाठी रेवदंडा गोळा स्टॉप येथे गाडीची वाट पहात होती. यावेळी स्वारगेट- मुरूड एसटीची धडक नम्रता वरसोलकर यांना बसली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.