श्रीवर्धनमधील पाच पावसाठी पर्यटनस्थळी जाण्यास बंदी , मेघरे, कारविणे, गालसुर धबधबा व बाणगंगा, सायगांव धरण परिसरात बंदी

By Raigad Times    18-Jul-2025
Total Views |
 shreewardhan
 
अलिबाग | श्रीवर्धन तालुक्यातील गेले चार दिवस मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यामुळे धबधबा, धरण व तलाव तुडूंब भरुन वाहत आहेत. या ठिकणी कुठलही दुर्घना घडू नये यासाठी मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारविणे येथील धबधब्यात एकाचा मृत्यू झाला होता.
 
धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात लोकांची गर्दी होऊ नये तसेच जिवीत हानी होऊ नये याकरीता ह्या परिसरात ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीकरिता श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
 
श्रीवर्धनमधील मौजे मेघरे, कारविणे, गालसुर धबधबा व बाणगंगा, सायगांव धरण या ठिकाणी जाण्यास ही मनाई करण्यात येत असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.