नागोठणे | नागोठणेजवळील चिकणी येथील आदिवासी वाडीतील अलका लहू जाधव (वय-३५ वर्षे) या महिलेने अंबा नदीवरील पुलावरून नदी पात्रात उडी घेतली आहे. बुधवारी, १६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लका जाधव ही महिला पती लहू जाधव यांच्यासोबत नागोठणे बाजूकडून वरवठणे बाजूकडे कामधंदा शोधण्यासाठी जात होते.
ते दोघेही अंबा नदीवरील नागोठणे व वरवठणे या गावांना जोडणार्या ऐतिहासिक पुलावरुन चालत जात असतानाच या महिलेने आपल्या हातात असणारी पिशवी हातातून खाली ठेवून पतीला काही समजण्याच्या आधीच अंबा नदी पात्रात उडी घेतली. या घटनेनंतर कोलाड येथील सह्याद्री वन जीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमला पाचारण या महिलेचा शोध सुरु आहे.