खोपोली | पेण-खोपोली मार्गावरील नव्याने होणार्या वडवळ टोल नाक्याजवळ दुचाकीस्वाराची स्कुटी स्लीप होऊन रस्त्याच्या मधोमध पडल्याने भरधाव येणार्या ट्रेलरखाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
दिलेश पोट्टे (वय ५५) हे खोपोलीकडे जात असताना वडवळ टोल नाक्याजवळ दुचाकीस्वाराची स्कुटी स्लीप होऊन दिलेश हे रस्त्याच्या मधोमध पडले. यावेळी भरधाव येणार्या ट्रेलरखाली ते चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळावरून पळालेल्या ट्रेलर चालकीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस करत आहेत.