तळा | तळा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (१५ जुलै) तहसीलदार स्वाती पाटील यांनी जाहीर केली. पंचायत समिती डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडलेल्या सोडतीला नायब तहसीलदार पालांडे, निवडणूक नायब तहसीलदार टेंबे, महसूल नायब तहसीलदार पाटील, विविध ग्रामपंचायतींमधील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुकांना फटका बसला आहे. तळा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्ग या गटांमध्ये व त्यांच्या महिला राखीव श्रेणींमध्ये पदाचे वाटप करण्यात आले आहे.
सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत उपस्थितांपैकी कोणीही कोणत्याही प्रकारे आक्षेप सूचना किंवा तक्रार मांडली नाही. त्यामुळे तहसीलदार स्वाती पाटील आरक्षण यादी निश्चित केली. या आरक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार होणारी राजकीय समीकरणे आणि स्थानिक नेत्यांचे नेतृत्व महत्वाचे ठरणार आहे.
सरपंचपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे |
१) अनुसूचित जाती : निगुडशेत, २) अनुसूचित जाती (महिला) : वांजळोशी, ३) अनुसूचित जमाती : मेढे, पिटसई, ४) अनुसूचित जमाती (महिला) : बोरघर हवेली, महागाव, ५) नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी: मालुक, वरळ, रोवळे, तळेगाव, ६) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : चरई खुर्द, शेणवली, गिरणे, ७) सर्वसाधारण : काकडशेत, पडवण, भानंग, मांदाड, रहाटाड, ८) सर्वसाधारण (महिला) : मजगाव, उसर खुर्द, पन्हेळी, सोनसडे, वनास्ते, कर्नाळा फळशेत, वाशीहवेली.