...तर परवाने परत करुन ढाबे सुरु करणार! महाड-बिरवाडी, पोलादपूर परमिट रुम, बार असोसिएशनचा इशारा

By Raigad Times    15-Jul-2025
Total Views |
 mahad
 
महाड | शासनाने करप्रणालीचा फेरविचार केला नाही, महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक परमिटरुम आणि बारचालक आपले परवाने शासनजमा करतील आणि ढाबे सुरु करतील, असा इशारा महाड-बिरवाडी, पोलादपूर परमिट रुम, बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांनी दिला आहे.
 
राज्यात मद्य विक्रीवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक कराविरोधात महाड पोलादपूर बिरवाडी परमिट रूम व बार असोसिएशनच्यावतीने सोमवारी (१४ जुलै) बंद पाळण्यात येऊन महाडमध्ये मोर्चा काढण्यात आला. शासनाने वॅटच्या नावा खाली लादलेला भरमसाठ कर रद्द करून वार्षिक वाढ थांबवावी तसेच महाड पोलादपूर तालुक्यात सुरु असलेली बेकायदेशीर मद्य विक्री थांबवावी यासह प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी महाड यांचे मार्फत शासनाला देण्यात आले.
 
पत्रकार परिषदेत महाड पोलादपूर बिरवाडी परमिट रुम/ बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल अगरवाल यांनी शासनाने मद्य विक्रीवर लावलेल्या भरमसाठ करवाढी विरोधात संपूर्ण राज्यात परमिट रूम व बार बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य बार असोसिएशनच्या वतीने घेतला आहे. या राज्यव्यापी बंद मध्ये महाड पोलादपूर व बिरवाडीतील सर्व परमिट रूम व बार चालक सहभागी झाल्याचे सांगितले.
 
शासनाने मद्य विक्री वरील ५% वरुन १०% करणेत आला आहे, परवाना शुल्क १५% वाढवण्यात आला,उत्पादन शुल्क ६०% वाढवण्यात आले. महाराष्ट्र शासनाने वॅट कराच्या नावाखाली लादलेल्या तसेच दरवर्षी सातत्याने वाढणार्‍या फीमुळे परमिट रुम धारक व ग्राहक यांचेवर अतिबोजा टाकण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या विविध मागण्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे . शासनाने १०% वॅट टॅक्स तात्काळ रद्द करावा, परवाना नुतनाकरणाची फी स्थिर करावी व वार्षिक वाढ थांबवावी.मद्यविक्रीतून महसुल विक्रीचा हेतू ठेवा पण मद्यनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यावरच टॅक्स लागु करावा, जेणेकरुन विक्रेत्यावर दुहेरीकरण भार येणार नाही.
 
त्याचप्रमाणे महाड, पोलादपूर, बिरवाडी मध्ये जे अनधिकृत धंदे चालेलेले आहेत . ढाबे, हॉटेल, चायनीज सेंटर, चायनीज गाड्या, टपरी वर गावोगावी मद्य विक्री होते व चायनीज हॉटेल व ढाबे वाले मद्य पिण्यासाठी परवानगी देतात अशा अनधिकृत धंद्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे, जर शासनाला महसूल हवा असेल तर हे अनधिकृत व्यवसाय बंद करावेत . बार चालकांनी वॅट, परवाना फी, उत्पादन शुल्क हे भरायचे आणि जे अनधिकृत धंदे चालेलेले आहेत ढाबे, हॉटेल, चायनीज सेंटर, चायनीज गाड्या, टपरी यांनी कोणताही टॅक्स भरायचा नाही.
 
त्यामुळे हे अनधिकृत व्यवसाय / धंदे बंद करावे व ज्या ढाबे, हॉटेल, चायनीज सेंटर, चायनीज गाड्या, टपरी यांना धंदा करायचा असेल तर मद्य विक्री परवाना घेऊन धंदा करावा अशी मागणी निवेदनाव्दारे शासनाकडे केली आहे असे सांगितले . याप्रसंगी बार असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष साहिल पार्टे,सरचिटणीस अमोद कळमकर, चिटणीस मनोज महाडीक, कार्यकारिणी सदस्य दिग्विजय शेडगे, सोनू कोर्पे, प्रकाश कदम ,सिध्देश गायकवाड, कपील जैन, सचिन पवार, आदी कार्य कारणी सदस्य व परवाना धारक सदस्य उपस्थित होते.