अलिबाग। मुंबई - गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील बायपास, सव्र्हस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीबाबत तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, तसेच संबंधित जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात यंत्रणेचे क्षेत्रीय अधिकारी, संबंधित आहे.
ज्या ठिकाणी पुलांची बांधकामे ठेकेदार उपस्थित होते. सुरु आहेत त्याठिकाणी वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळक पणे लावावे. आवश्यकतेप्रमाणे ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक जाळ्या लावाव्यात. रायगड जिल्ह्यातील जिल्हाप्रशासनाचा प्राधान्याचा विषय पर्यायी मार्गाचे आवश्यकते प्रमाणे तात्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
महामार्गाच्या कामामध्ये प्रास्तावित असलेल्या सर्व सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग, साईड पट्ट्या यांचे काम प्राध्यान्याने पूर्ण करावे. सर्व संबंधित यंत्रनेने काम पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करावी. महामार्गाचे काम हा आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपसून सुरु असून अपूर्ण काम व कामाच्या अनियमिततेमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच आगामी येणारे सण, उत्सव इत्यादींचे अनुषंगाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत व कार्यवाहीचाआढावा त्यांनी यावेळी घेतला.
माणगाव, इंदापूर येथे ट्रॅफिक वार्डन नेमावे
गणेशोत्सवादरम्यान माणगाव, इंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरण यांनी ट्रॅफिक वार्डन नेमण्यात यावेत. या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्राधिकरणाला दिले आहे.