पाली/बेणसे | सुधागड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कामगार व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रमोद मोरे यांनी असंख्य समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आ.महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विधानसभा संघटक लहू पाटील व प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संतोष कदम, भूषण शेलार, बाबू शिंदे, धीरज शेलार या प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष व रिलायन्सभारतीय श्रमिक शक्ती संघ युनिटचे जनरल सेक्रेटरी म्हणून प्रमोद मोरे हे कार्यरत आहेत. मोरे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या प्रवेशाने पक्ष संघटना वाढीसाठी निश्चित लाभ होईल, असे आ.दळवी म्हणाले.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकारी आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानवडे, उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे, माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, कामगार नेते अरुण कुथे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.