कर्जत | येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तसेच १ ते ७ जुलै दरम्यान आयोजित कृषी सप्ताहाचा समापन कार्यक्रमही उत्साहात पार पडला. कृषिदिनाचे औचित्य साधून सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांचे हस्ते नारळ वाढवून पैदासकार कर्जत-५ बीजोत्पादन प्लॉटचे पूजन केले.
पेढेवाटून उत्साहात लावणी करून कृषी सप्ताहाचे यशस्वी समापन करण्यात आले. कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनपटाचा नेटया शब्दात आढावा घेतला. त्यांच्यामुळेच अन्नधान्य, दुग्धोत्पादन, कृषि शिक्षण, सिंचन, वीज प्रकल्प, ग्रामविकास इ. क्षेत्रात राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कीटक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, कनिष्ठ कृषिविद्यावेत्ता डॉ. नामदेव म्हसकर यांच्यासह अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.