जुलैच्या सुरुवातीला पावसाची तुफान हजेरी , रायगडला यलो अलर्ट

By Raigad Times    01-Jul-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | महाराष्ट्रात पुढील ४ दिवस दमदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे हायअलर्ट देण्यात आले आहेत. आज, १ जुलै रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड, ठाण्यातही येलो अलर्ट आहे.
 
पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.