किल्ले रायगडवरील धनगर समाज बांधवांना पक्की घरे घ्या

By Raigad Times    01-Jul-2025
Total Views |
 mahad
 
महाड | छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गडावर वास्तव्यास असणार्‍या व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीचे जतन करणार्‍या गडावरील २४ धनगर समाजाच्या बांधवांना शासनाने पक्क्या घरांची निर्मिती करून त्यामध्ये या २४ समाजबांधवांना पुनर्वसित करावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी किल्ले रायगडावर केली.
 
एक महिन्याच्या कालावधीत केंद्रीय पुरातत्त्व विभाग व वनखा त्यामा फ र् त किल्ले रायगडावर अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या धनगर समाजाच्या २४ बांधवांना घर खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आपली सुस्पष्ट भूमिका मांडताना आ.गोपीचंद पडळकर यांनी या घराशेजारीच असलेली पोलीस चौकी व लगतची स्वच्छतागृहांची इमारत जर या दोन विभागांना चालते.
 
कोणत्याही परिस्थितीत येथील धनगर समाजाच्या घरांना हात लावू देणार नसल्याचा या स्पष्ट इशारा दिला. याप्रसंगी स्थानिक धनगर समाजाच्या नागरिकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना शासनामार्फत बजावण्यात आलेल्या नोटीसांची माहिती दिली. आपण छत्रपतींच्या काळापासून या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आणून या ठिकाणीआम्ही मातीच्या घरामध्ये राहत असल्याचे सांगितले.