रिलायन्स नागोठणेच्या कामगारांना पगारवाढ

By Raigad Times    05-Jun-2025
Total Views |
 pali
 
पाली/बेणसे | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात २०२५ या वर्षी अतिशय महत्वपूर्ण असा वेतनवाढ करार झाला. या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांचे चहूबाजुनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगारवाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा आजवरच्या इतिहासातील २०२५ वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचा दावा व स्पष्ट मत रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते व विविध कामगार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी रिलायन्स टाऊनशीप वृंदावन येथे बुधवार, ४ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
या करारादरम्यान सर्व कामगार संघटनांची एकजूट प्रभावी व निर्णायक ठरली असून कामगारांचा हित जोपासणारा हा यशस्वी व समाधानकारक वेतनवाढ करार झाला असल्याचे कामगार नेते साधुराम मालुसरे, दीपर्क रानवडे, विकार्स चवरकर, लक्ष्मण खाडे यांनी सांगितले.विशेष म्हणजे रिलायन्स नागोठणे कंपनीत गुणवत्ता, कौशल्य व शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत संधी मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून भविष्यात देखील स्थानिक सुशिक्षित तरुणांना नोकर्‍या मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
त्यामुळे कामगार संघटनांचे सर्व नेते व पदाधिकारी यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे. सन १९८९ पासून कार्यान्वयीत झालेल्या या प्रकल्पामध्ये कार्यरत असणारे कामगार यांना प्रत्येक वेतनवाढ कराराच्या रूपाने सुरुवातीपासूनच भरीव पगारवाढ, बोनस, ऊत्तम वैद्यकीय सुविधा, मुलांना मोफत शिक्षण व अन्य विविध प्रकारच्या सेवाशर्ती-सवलती मिळवून देण्यात कामगार संघटना यशस्वी झाल्या आहेत.
 
सन २०२०-२०२१ मध्ये कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण जगातील जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील आम्ही कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून ११ जानेवारी २०२१ रोजी वेतनवाढ करार करून कामगारांना ऊत्तम पागारवाढ, महागाई भत्ता स्कीम, बोनसव अन्य सेवाशर्ती-सवलती मिळवून देण्यात यशस्वी झालो. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सविस्तर माहिती दिली होती.
 
असेही यावेळी सांगण्यात आले. वेतनवाढ करार यशस्वी होणेकरिता कामगार नेते साधुराम दादा मालुसरे, दीपक रानवडे व विकास चवरकर यांनी विशेष लक्ष केंद्रित करून आपापले पदाधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करूनसदर वेतनवाढ करार यशस्वीपणे पूर्ण करणेकरिता परिश्रम घेतले. २१ मे रोजी झालेल्या सभेमध्ये सर्व कर्मचारी यांचेकडून कामगार संघटना फोरमचे वरिष्ठ पदाधिकारी तसेचमार्गदर्शक कामगार नेते यांचे मनः पूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन यांचेही आभार मानण्यात आले.