महाड | महाड नातेखिंड दरम्यानच्या रस्त्यावर एका एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकी आणि ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बुधवारी (४ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाड एसटी आगारातून सुटलेल्या बस क्र. एम एच १४ बीटी ४९०६ ने महाड रायगड मार्गावर दस्तुरी नाका ते नाते खिंड दरम्यानच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका दुचाकी व ट्रकला धडक दिली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वार राजू मांडवकर याने दुचाकीवरून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे; मात्र या अपघातात तो जखमी झाला असून त्याच्यावर डॉ. रानडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.