अलिबाग | श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ५ जून रोजी सायं. ४ ते दि. ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यत तसेच माणगाव- निजामपूरमार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा-२०२५ हा कार्यक्रम दि. ५ जून व दि. ६ जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने शिवभक्त हे आपापली वाहने घेवून येत असतात. तसेच सदर कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता येत असतात. या सोहळ्याकरिता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगाव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला,महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत.
या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात. तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा- नागोठणे-कोलाड-माणगाव-महाड या महामार्गावरून येत असतात. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शयता नाकारता येत नाही.
या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी जावळे वाहतूक बंदी जाहीर केली आह. सदरची वाहतूक पंपी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑसीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तु चाहून नेणारी वाहने, मोवीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना लागू राहणार नाही. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारीजावळे यांनी दिले आहेत.