पनवेल | जेएनपीटी महामार्गावरील उड्डाणपुलावर पुष्पकनगरसमोरील एका सिमेंट मिक्सरच्या टाकीतून डिझेल चोरणार्यांना हटकले असता, त्यांनी वाहतूक पोलिसांना जोरदार धक्का देऊन त्यांच्याकडील मोटारगाडीतून पळ काढला. रात्री १२. ४५ वाजता ही घटना घडली.
पनवेल वाहतूक शाखेचे रात्रीची गस्त घालणारे पोलिस हवालदार अमीर रसूल मुलाणी आणि त्यांचे सहकारी युवराज येळे यांनी डिझेल चोरांना हटकले असता, त्या दोघा चोरांनी येळे यांना जोरदार धक्काबुक्की करत खाली पाडले. याशिवाय त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळून गेले. याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.