कर्जत तालुक्यात शेकापची नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर

By Raigad Times    27-Jun-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जतमध्ये एकेकाळी चांगले प्राबल्य असलेला शेकाप आता संक्रमणातून जात आहे. तालुक्यात शेकापक्षाला नवीन उभारी देण्यासाठी शेकापने नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. तालुका चिटणीस म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
कर्जत येथील मार्केट यार्डमध्ये शेकाप कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी माजी तालुका चिटणीस श्रीराम राणे यांना जिल्हा खजिनदारपद, महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून स्विटी बार्शी, युवक अध्यक्ष अनिल जोशी, शेतकरी सभा अध्यक्ष म्हणून प्रकाश फराट, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष सर्फराज नजे, व्यापारी सेल तालुका अध्यक्ष नितेश शाह, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष दत्तात्रय निरगुडा, आरोग्य सेवा सेल अध्यक्ष हनुमंत बदे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष सागर पेमारे तसेच, कामगार आघाडी दत्ताराम जगताप, अधिवक्ता आघाडी अध्यक्ष म्हणून अ‍ॅड.सतीश पाटील, शिक्षक आघाडी अध्यक्ष म्हणून प्रमोद गाडे, क्रीडा सेल अध्यक्ष म्हणून जीवन कोंडिलकर, दिव्याग सेल अध्यक्ष अरुण जोशी आणि शेतमजुर आघाडी मोहन पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
 
कर्जत तालुक्यातील सात कार्यकर्त्यांना जिल्हा चिटणीस मंडळात सहभागी करून घेतले आहे. त्यात माजी सरपंच पुंडलिक शिनारे, गजानन पेमारे, पांडुरंग बदे, सुहास भगत, दीपक लोभी, सुधीर कांबळे आणि रमाकांत तोरणे यांना संधी देण्यात आली आहे. कर्जत तालुका चिटणीस म्हणून तानाजी मते, तालुका सह चिटणीस अशोक भुसाळ, रविंद्र भोईर आणि मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.
 
कार्यालय चिटणीस म्हणून तर तालुका खजिनदार म्हणून दत्तात्रेय राणे, राजेंद्र हजारे आणि सदस्य म्हणून कृष्णा बदे, रामचंद्र भोईर, बबन भालेराव, शिवाजी बिबवे, प्रकाश ऐनकर, कृष्णा शिंगे, महादेव (बाका) मरे, दिलीप (बादशाह) पाटील, राजन विरले, शंकर देशमुख, विष्णू कालेकर, नीलम ढोले, शैला निकम, शिल्पा लोभी, नामदेव सोनवले, शिवाजी भगत, दशरथ शेंडे, अनंता शिंगोले, बबन गांधीवले, अनंत दळवी, दीपक पाटील, सुनील भागीत, पुंडलिक मसणे, मारुती विरले, नरेंद्र हजारे, दीपक धुळे, तानाजी लोभी, छगन सावंत, अरुण शेळके, ताटूराम जाधव, माधव मिणमिणे आदी या कार्यकारिणीत आहेत.