माणगाव | माणगाव शहरात वाहतूक शिस्तीचा भंग रोखण्यासाठी आणिबेकायदेशीर वाहनधारकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने माणगाव पोलीस आणि वाहतूक विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवून शहरात माणगाव, पुणे या महत्त्वाच्या मार्गावर तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी केली.
या नाकाबंदीमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, नियम न पाळणार्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणे, गाडीचे विविध कागदपत्रे तसेच प्रदूषण प्रमाणपत्र नसणे, अवैध नंबर प्लेट्स, सीटबेल्ट न लावणे, तुटलेली नंबर प्लेट वाहन, काळी काच असणारी वाहने, लायसन्स नसणे,ट्रिपल सीट बाईकस्वार, बुलेट, वाहनाच्या सायरनचा कर्कश आवाज असणार्या वाहन चालकावर, वाहनांची विविध कागदपत्रांची अपूर्णतः अशा विविध कारणांमुळे अपघातांची शक्यता वाढत होती.
या पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे पुढाकार घेत कडक नाकाबंदी मोहीम हाती घेतली. या कारवाईत दररोज सकाळी व सायंकाळी शहरातील मुख्य चौक व बाजारपेठ गर्दीची ठिकाणे, एसटी बस स्थानक, महाविद्यालय परिसर, मोकळ्या जागा आणि महामार्गावर तपासणी केंद्रे उभारण्यात आली. या तपासणीत शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
अनेक वाहनांवर कागदपत्रे नसल्यामुळे दंड आकारण्यात आला. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांनी नियोजन करून माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.