कोलाड | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. सोमवारी (२३ जून) रात्री खांब हद्दीत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी जखमी झाले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खांब हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर ही दुर्घटना घडली.
सिद्धेश योगेश शिंदे (रा. खडकपाडा, कल्याण पश्चिम) हे सुझुकी सियाज कारने चिपळूणहून कल्याणकडे निघाले होते. त्रमुंबई-गोवा महामार्गावरुन जात असताना खांब गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये आदित्य दिपू वर्मा (वय ३८, रा.कमला देवी कॉलेज हेरीटेल ठाणे) यांचा मृत्यू झाला.
तर निलेश राधानी (वय २५, रा कल्याण), सिद्धेध योगेश शिंदे (वय २६) आणि अमित विजय करपे (रा. खडकपाडा कल्याण वेस्ट) हे तिघेही जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच अपघातग्रस्तांना टीम या संस्थेने मदत केली. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गायकवाड करीत आहेत.