महाड | महाडमधील विविध शाळांना ‘हिंदी सक्ती’विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र व निवेदन स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी दिले आहे. यावेळी विद्यार्थी सेनेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष विवेक ठोंबरे, मनसे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे, मनविसेचे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, महाड तालुका सचिव मयुर बहिरम, महाड शहर उपाध्यक्ष प्रथमेश पवार उपस्थित होते.
राज्य सरकारने शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्रानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा अनिवार्य केली आहे. सरकारच्या मते, यामागचे राष्ट्रीय एकात्मता आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी वाढविण्याचा हेतू आहे. असे सांगतिले जात असले तरी हा मराठी भाषा आणि संस्कृतीवर हल्ला आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून एका राज्याची भाषा आहे.
महाराष्ट्रात ती सक्तीने शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे शाळांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सैनिकांनी केली आहे.