बेणसे | बेणसे सिध्दार्थ नगर येथील गावाखाली असणार्या एका शेत तलावात (सालडोली) पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी (२० जून) घडली. जोहेब जाकीर अत्तर (वय १७), मिझान जाकीर अत्तार (वय १४), अश्फाक अली (वय १६) अशी या मुलांची नावे आहेत.
या बुडालेल्या तरुणांना काही तरुणांनी बाहेर काढून तात्काळ रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये आणण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. माहिती मिळताच पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी रुग्णालयात दाखल झाले होते.