कर्जत | नेरळ-कळंब मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात दुचाकीवरून प्रवास करणार्या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२० जून) दुपारी नेरळ कळंब भागातील वरई येथील एक्सपेरिया साईट रोडवर मारुती सेलेरिओ कारने दुचाकीला धडक दिली.
डंपरला ओव्हर टेक करत असताना स्कुटीला समोरून उडविले. ही धडक इतकी जोरात होती की, त्यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे विनोद पिल्ले आणि सुषमा विनोद पिल्ले हे दाम्पत्य शेतात फेकले गेले. त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. कारचालक संस्कार मुकेश अंजने या २४ वर्षीय तरुणाला नेरळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे करीत आहेत.