आगामी निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यात भगवा फडकवणारच , कर्जत येथे शिवसेना शिंदे गटाचा निर्धार

By Raigad Times    20-Jun-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुरुवारी (१९ जून) रायगड जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकावण्याचा निर्धार या पदाधिकार्‍यांनी केला. तालुक्यातील पोसरी येथील पॅरामाऊंट बँक्वेट हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी आमदर महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विजय पाटील, सुनील पाटील, संभाजी जगताप सुदाम पवळी, संदेश पाटील आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
 
या आढावा बैठकीत शिवसेना पक्षवाढीसाठी व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. येणार्‍या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकावण्याच्या निर्धार करण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारीला लागावे,असे सूचित केले.याप्रसंगी शिवराम बदे, दिलीप ताम्हाणे, संकेत भासे, रमेश मते,अंकुश दाभणे,गजेंद्र वाघेश्वर,सुनील रसाळ, आदींसह महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.