मुरुड-जंजिरा | मुरुड शहरातील सिद्धी मोहल्ला भागात गाडी पार्किंग करण्याच्या वाद विकोपाला गेला आणि या वादातून शाहीदा आदम मजगावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरुड शहरातील सिध्दीमोहल्ला येथे गाडीच्या पार्किंगवरून ही वादाची घटना घडली.
शाहीदा मजगावकर यांच्या तक्रारीनुसार, रहीम उर्फ चॉद सिरताज सय्यद याने शाहीदा यांच्या मुलाच्या गाडीसमोरील काचेवर व पाठीमागील पत्त्यावर फाईट मारून नुकसान केले. तसेच शाहीदा या वयोवृध्द असतानाही व कॅन्सर रुग्ण असतानाही रहीम (चॉद) सिरताज सय्यद यांनी त्यांना जोरदार धक्काबुक्की करत, मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मारहाणीत धक्का लागून शाहीदा या ग्रेनाईटच्या जिन्यावर पडल्या.
यात त्यांच्या डोयास मार लागून अंतर्गत गंभीर दुखापत केल्याची तक्रार मुरुड पोलिस ठाण्यात शाहिदा आदम मजगावकर यांनी दाखल केल्यावर मुरुड पोलिसांनी योग्य तो डॉटर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर रहीम (चॉद) सिरताज सय्यद, रियाज सिरताज सय्यद, सिमा रियाज दुकानदार, राहीला आल्ताफ खान यांच्यावर बिएनएस २०२३ प्रमाणे कलम ११७ (२),११५(२), ३४२ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शाहिदा आदम मजगावकर यांनी पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.