माथेरान येथील शार्लोट लेकमध्ये तीन पर्यटक बुडाले , एकाचा मृतदेह सापडला

By Raigad Times    16-Jun-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | माथेरान येथील शार्लोट लेकमध्ये पोहायला उरतलेले तीन पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी (१५ जून) घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, दोघांचा शोध सुरु आहे. रविवारी नवी मुंबई येथील दहा तरुणांचा ग्रुप पर्यटनासाठी माथेरान येथे आला होता. रविवारी दुपारी शार्लोट लेक परिसरात गेल्यानंतर त्या ग्रुपमधील काही तरुण लेकमधील पाण्यात उतरले.
 
मात्र तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख हे तिघे तरुण तलावात बुडाले. १६ ते १९ वर्षे वयोगटातील हे तरुण आहेत. पर्यटक पाण्यात बुडाले असल्याची माहिती मिळताच माथेरान पोलीस आणि सह्याद्री आपदा मित्र हे शार्लोट लेक येथे धावून गेले.
 
मात्र संध्याकाळ होत आल्याने पाण्यात उतरुन शोध घेणार्‍या आपदा तरुणांना अडचणी येऊ लागल्या. मात्र अंधार पडेपर्यंत एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. अन्य दोघांचे शोधकार्य सकाळी पुन्हा सुरु करण्यात येईल.