पेणजवळ इलेक्ट्रीक बाईकला आग

By Raigad Times    14-Jun-2025
Total Views |
 pen
 
पेण | मुंबई-गोवा महामार्गावर मोटारसायकलला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागलेली मोटारसायकल ही इलेक्ट्रीक बाईक असल्याची माहिती मिळाली आहे.
 
मोटारसायकलमधील यंत्रणेत बिघाड झाल्याने पेट घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारसायकल चालक वेळीच सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.