ठाकरे शिवसेनेच्या रोहा तालुकाप्रमुखपदी नितीन वारंगे यांची निवड

By Raigad Times    13-Jun-2025
Total Views |
 roha
 
रोहा | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदेशानुसार शिवसेनेच्या रोहा तालुकाप्रमुखपदी नितीन वारंगे यांची निवड करण्यात आली. गेली १५ वर्षे वारंगे हे पक्षात एकनिष्ठ राहिल्यामुळेच त्यांना केलेल्या कामाचे फळ मिळाल्याने शिवसेनेमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
 
गुरुवारी (१२ जून) संपूर्ण शिवसेनेच्या टीमने रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज चरणी नतमस्तक होऊन आनंद साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून रोहा शिवसेनेला तालुकाप्रमुख कोण मिळणार? अशा चर्चेला उधाण आले होते; परंतु एका कट्टर शिवसैनिकाला संधी देण्यात आली आहे.
 
नितीन वारंगे यांच्यासमोर पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्याचे आव्हान असेल; परंतु गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव लक्षात घेता व नितीन वारंगे यांचा दांडगा संपर्क असल्यामुळे निश्चितच ते पक्षाला रोह्यात उभारी देतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दरम्यान, आगामी काळात निश्चितच पक्षाच्या विचारधारेनुसार तालुक्यात पक्षाला चांगले दिवस येतील. सर्व सहकार्‍यांना सोबत घेऊन संपूर्ण ताकदीने येणार्‍या निवडणुकीत उतरू व यशस्वी होऊन दाखवू, असा विश्वास नवनिर्वाचित तालुकाप्रमुख नितीन वारंगे यांनी व्यक्त केला आहे.