पनवेल | कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना खारघर येथील सेक्टर ३४ मधील डॉल्फीन प्राईड सोसायटीत एका धक्कादायकघटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुळचे पाकिस्तान येथे राहणारे हे दाम्पत्य होते, भारत रहायचे कि पाकीस्तानात यावरुन दोघांमध्ये वाद असल्याची माहिती पुढे आली आहे.
नोतन ऊर्फ संजय सचदेव आणि त्याची पत्नी सपना हे मुळचे पाकिस्तानमधील रहिवासी आहेत. नोव्हेंबर २०२४ साली आपल्या मुलांसह सहा महिन्याच्या व्हिसावर भारतात आले होते. नोतन हे नवी मुंबईतील खारघर येथे राहत होते. नोतनला पाकिस्तानमध्ये परत जायचे नव्हते, त्यामुळे त्यांने येथेच भावाच्या ड्रायफु्रटच्या व्यावयायात हातभार लावायला सुरुवात केली होती. मात्र यातून नोतन यांच्या हाती काहीच लागत नसल्यामुळे गेले काही दिवस तो घरीचा होता. या दाम्पत्याला दहा आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत, सोमवारी मुलं शिकवणीला बाहेर गेल्यानंतर या दाम्पत्यामध्ये वाद सुरु झाला.
या रागातून नोतन सचदेवने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नी सपनावर वार करून तिची हत्या केली यानंतर त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. मुले शाळेतून घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, नोतन दासला पाकिस्तानला परत जायचे नव्हते, तर सपना पाकिस्तानमध्ये जाण्याचा हट्ट करत होती.
यावरुन दोघांमध्ये कायम खटके उडत असत, अशी माहिती सपना हिच्या बहिणीने दिली आहे. २५ मे रोजीदेखील सपनाला नोतनदास यांनी मारहाण केली होती. त्यावेळी सपनाने नवी मुंबई पोलिसांकडे संपर्क केला होता. पोलिसांनी नोतन याला समज दिली; मात्र यावेळी सपनाने आपसातील भांडण आहे, असे म्हणत तक्रार दिली नाही.