फरशी साफ करण्याचे फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

By Raigad Times    28-May-2025
Total Views |
 panvel
 
नवीन पनवेल | इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून इमारतीच्या भिंतीना व कॉलमला तडे गेले असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. यावर ग्रामपंचायत कार्यालयातकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नैराश्य आले आणि संजय शेखर घाडी यांनी नवीन पनवेलमधील गार्डनमध्ये फरशी साफ करण्याचे फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
 
त्यांच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद खांदेेशर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय घाडी यांनी रसायनी, रिस कांबा येथे बांधकाम व्यावसायिक अतुल दिघे, दीपक जोशी, जागामालक सत्विंदर सिंग पाबला, प्रशांत गायकवाड यांनी बांधकाम केलेले हेरंबा गुरुकृपा इमारत येथे २०१८ मध्ये वन बीएचके रूम बँकेचे कर्ज काढून घेतले. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने इमारतींच्या भिंतींना व कॉलमला तडे गेले आहेत.
 
इमारत धोकादायक झाली आहे. याबाबत सोसायटी आणि ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच रूमच्या कर्जाचे हप्ते भरणे बाकी असल्याने आणि निकृष्ट रूम ताब्यात मिळाल्याने संजय घाडी यांनी २१ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नवीन पनवेल सेटर ११ येथील गार्डन मध्ये फरशी साफ करण्याचे फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फसवणूक झाल्याने आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी घाडी यांनी केली आहे.