पेण येथे वीज ग्राहकांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक , महावितरणच्या अधिकार्‍यांना शिष्टमंडळाने विचारला जाब

By Raigad Times    26-May-2025
Total Views |
 pen
 
पेण | पहिल्याच पावसात तासंतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जिणे हैराण झाले आहे. संतप्त झालेल्या वीज ग्राहकांचे प्रश्न मांडण्याकरिता शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकार्‍यांना जाब विचारला.
 
कोकण आपत्ती समीकरणांतर्गत कोकण विभागातील सर्व वीज वाहिन्या भूमिगत करायचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उघड्या वाहिन्यांमुळे अपघात होऊन जैविक हानी होण्याची शयता असल्याने वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास ५ जूननंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
 
या आंदोलनात शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावंड, माजी सभापती संजय भोईर, पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, घनश्याम कुथे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, युवा सेनेचे सुधीर ढाणे, चेतन मोकल, भगवान पाटील, राजू पाटील, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
* जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून नवीन पोलची उभारणे
* पोलवरील नादुरुस्त झालेल्या फॅब्रिकेशनची दुरुस्ती त्वरीत करावी
* विद्युत पुरवठा करणार्‍या खराब झालेल्या तारा बदलून नवीन विद्युत तारा बदलून ग्राहकांना अखंडीतपणे विज पुरवठा करावा.
* विद्युत ग्राहकांच्या तकारी घेण्यांसाठी व तक्रारींचे निवारण करण्यांसाठी कायम स्वरुपी कर्मचार्‍यांची नेमणूक करावी.
* नवीन विद्युत कनेशन हे कमीत कमी खर्चाने मिळावे.
* ग्राहकांचे जळालेले मिटर किंवा बंद पडलेले मिटर हे खात्यामार्फत मोफत बद्बलून मिळावे.