कोर्लई | साळाव-रोहा रस्ता रुंदीकरणात मुरुड तालुयातील मिठेखार ग्रामपंचायत हद्दीतील जेएसडब्ल्यू कंपनी कॉलनी दरम्यान रस्त्यालगत मुळाचे बुंधे अर्धवट अवस्थेत असलेली झाडे धोकादायक ठरत असून पावसाळ्यात वादळात अपघाताची शयता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
साळाव-रोहा रस्ता रुंदीकरणात मिठेखार ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे जोरदार काम चालू आहे. हे काम करीत असताना सदर ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोदून मोठमोठी झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. या झाडांच्या परिसरात मिठेखार ग्रामपंच्यायतचे गाळे असून काही व्यावसायिक तेथे उदरनिर्वाह साठी व्यवसाय करतात. जे.एस.डब्लू वसाहतीमध्ये स्टेट बँक शाखा व माध्यमिक विद्यालय आहे.
त्यामुळे तळेखार ते सालाव विभागातील नागरिकांची तेथे नेहमी गर्दी असते. आगामी पावसाळ्यात वेळप्रसंगी ही झाडे मुळासकट रस्त्यावर कोसळून अपघाताची शयता नाकारता येत नाही. ही झाडे कधीही रस्यावर ये-जा करणार्या माणसाच्या अंगावर पडून जीवित व वित्तहानीची देखील शयता नाकारता येत नाही. तसेच वाहन चालकांच्या अंगावर पडून खूप मोठी जीवित हानी होण्याची शयता नाकारता येत नाही.
सदरील ठेकेदारास वारंवार सूचना देण्यात येवून सुद्धा ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे. शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी यात जातीने लक्ष घालून, प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.