खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून कर्जत आणि नेरळ स्थानकाची पाहणी!

By Raigad Times    24-May-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकाला भेट दिली.या भेटीमध्ये दोन्ही स्थानकातील विकासकामांची पाहणी तसेच प्रस्तावित विकास कामे याबद्दल रेल्वे अधिकार्‍यांनी खासदार बारणे यांना अवगत केले. दरम्यान,या भेटीमध्ये कर्जत आणि नेरळ स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या समस्या याबाबत स्थानिक नागरिकांनी खासदारांना घेरले.
 
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदारसंघात असलेल्या नेरळ जंशन आणि कर्जत स्थानकातील विकास कामे यांची पाहणी करण्यासाठी भेट दिली. या भेटीच्या वेळी शिवसेना, भाजप या पक्षाचे कार्यकर्ते तसेच नेरळ गाव आणि कर्जत शहरातील नागरिक तसेच प्रवासी यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न खासदार यांच्यासमोर मांडले.खासदार बारणे यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर,जिल्हा संघटक संभाजी जगताप,तालुका तालुका सुदाम पवाळी आणि युवा सेनेचे विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे उपस्थित होते.
 
नेरळ स्थानकात दोन्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, त्यात भाजप माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत,तालुका सचिव अंकुश दाभने,शहर संपर्क प्रमुख किशन शिंदे,जयवंत साळुंखे,केतन पोतदार,माजी सभापती राहुल विशे,तसेच ठाकरे शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी प्रथमेश मोरे,दिनेश भोईर आदी सह अनेक नागरिक प्रवासी उपस्थित होते.यावेळी मध्य रेल्वे कडून विभागीय कमर्शियल अधिकारी अजय कुमार,कर्जत कल्याण कमर्शियल अधिकारी शिरीष कांबळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे आय डबलू के एस यादव, सीबीएस के जी विनोद, सिटीआय राजेश संधिर,आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर नेरळ स्थानकातील विकास कामे तसेच नव्याने बदलत असलेल्या नेरळ स्थानकाच्या मेक ओव्हर कामां ध्ये कोणती कामे नियोजित आहेत यांची माहिती खासदार बारणे यांना देण्यात आली. नेरळ स्थानकात पाडा फाटक बाबत तेथील परिसर वाहतूक कोंडी मुळे कंटाळला असून तत्काळ उड्डाण पुल होण्याची कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी पंढरीनाथ चंचे यांनी केली.तर स्थानकाच्या बाहेर असलेल्या निवासी घरां ध्ये सांडपाणी आणि पावसाचे पाणी जात असून ते बाहेर काढण्याचे नियोजन रेल्वे कडून करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी गुल्या जाधव यांनी केली.
 
नेरळ स्थानकात पादचारी पुलावर लावण्यात आलेले पूर्व पश्चिम यांचे फलक यांबाबत दिनेश कालेकर यांनी तक्रार करून ते चुकीचे बोर्ड हटवण्यात यावेत अशी मागणी केली.निर्माण नगरी भागातील महिला नागरिक यांनी पावसाचे पाणी या भागात भरून राहत असून रेल्वे कडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली.कर्जत स्थानकात सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर स्टेशन प्रबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीत कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याचे गाड्या यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी केली.त्यावेळी खासदार बारणे यांनी वेगवेगळ्या १४ गाड्यांना कर्जत येथे थांबे देण्यात आले असल्याची माहिती दिली. खासदार यांचे सोबत कर्जत पंचायत समिती माजी उप सभापती मनोहर थोरवे,शिवसेना तालुका संघटक दिलीप ताम्हने, मते,माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे हे देखील उपस्थित होते.